वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे - उतारा व त्यावर आधारित प्रश्न
"शाळा ही ज्ञानाचे मंदिर आहे. इथे शिक्षक विद्यार्थ्यांना विविध विषय शिकवतात. वर्गात शिस्त पाळणे आवश्यक असते. शाळेत ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि खेळाचे मैदान असते. विद्यार्थी पुस्तक वाचून ज्ञान वाढवतात. प्रयोगशाळेत विज्ञानाचे प्रयोग करतात. मैदानावर खेळून शरीर तंदुरुस्त ठेवतात. शाळेत स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा आणि विविध उपक्रम होतात. या सर्वांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. शाळा आपल्याला जीवनात योग्य मार्ग दाखवते."
मैदानावर खेळल्याने काय होते?
मैदानावर खेळल्याने काय होते?
A
शरीर तंदुरुस्त राहते
B
ज्ञान वाढते
C
गाणी शिकता येतात
D
चित्रकला सुधारते
आपल्या शरीराचा तोल सांभाळत तेनसिंह आणि हिलरी काळजीपूर्वक एव्हरेस्टच्या शिखराची चढाई करत होते. ते थकलेले होते. परंतु ते आशा न सोडता धैर्याने पुढे जात होते. बर्फात पाय ठेवण्यासाठी तेनसिंहने बर्फ किती खोलवर आहे हे शोधण्याकरिता खड्डा केला. चढाई करताना त्यांना 12 मीटर उंच सुळका दिसला.
अत्यंत कठिण परिस्थितीत, काळजीपूर्वक त्यांनी सुळका सर केला. अखेर त्यांचा संघर्ष संपला. ते एव्हरेस्टच्या शिखरावर होते. एव्हरेस्ट हे जगातील सर्वांत उंच शिखर आहे. तेनसिंह आणि हिलरीने उत्साहाने एकमेकांकडे पाहिले. त्यांची हृदये आनंदाने ओसंडत होती.
तेनसिंह आणि हिलरी उत्साहित का झाले !

ते शिखरावर पोहोचले होते.
B
त्यांनी उंच सुळके पाहिले.
C
त्यांनी बर्फात खड्डे केले होते.
D
ते बर्फामध्ये सहज रित्या चालू शकत होते.