ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ६ - (मराठी )
आकलन - उतारा
उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
शरद ऋतु हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो.या सुंदर ऋतुत खूप बदल होतात. दिवस लहान होतो. झाडाच्या पानांचा रंग बदलतो. पाने हिरवी न राहता तांबुस लाल, पिवळी आणि नारंगी रंगाची होतात. वस्तुतः पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो. ऊन न मिळाल्याने पाने पिवळी होतात. गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरतात, कारण तापमान हिमबिंदूपर्यंत खाली येते. जनावरे हिवाळ्याच्या दिवसांसाठी पुरेसे खाद्य साठवू लागतात. हे बदल तेव्हा होतात जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो.

शरद ऋतुत पाने पिवळी होतात कारण __________
a :
त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही
b :
त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही
c :
त्यांना योग्य प्राणवायू मिळत नाही
d :
जास्त प्रमाणात प्राणवायू एकत्रित होतो
Explanation :
ऊन न मिळाल्याने पाने पिवळी होतात.
INSTALL APP